Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर

गावच्या भल्यासाठी लढून देखील,विरोधकांचे रडगाणे. – अनुराधा आदिक

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

श्रीरामपूर नगरपालिकेचा सफाई ठेका नेहमी चर्चेचा विषय ठरतो. सद्गुरू बहुद्देशीय संस्था तळोदा जि. नंदुरबार,यांचा ३१ लाख ८३ हजार २१ रुपयांचा ठेका रद्द करून, पैसे वाचविण्याच्या दृष्टीने सभागृहात बहुमताने सुधर्म कंपनीस २५ लाख ३६ हजार ८०८ रुपयांना ठेका देण्यात आला.

Shrirampur Ads


यावेळी सदर ठेकेदाराने सभागृहासमोर ठरलेल्या रकमेत सफाई कर्मचार्‍यांचे वाढीव पगार,शहरातील सफाई,दैनंदिन कचरा गोळा करणे,ईत्यादी कामे करण्याचा
शब्द सभागृहाला दिले होता. मात्र यावेळी २५ लाख ३६ हजार ८०८ रुपयांच्या ठेक्यात हे सर्व शक्य होत नसल्याने, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सफाईच्या ठेक्यास विरोध दर्शविला. कारण कर्मचार्‍यांचे पगार, १६ वाहनांवरील चालकांचा पगार, नगरपरिषदेस वाहनांचा परतावा देणे सदर रकमेत होणार नाहीत यासाठी नगराध्यक्षांनी विरोध केला होता. तसेच घनकचरा ठेका जरी कमी निविदा असल्यामुळे सुधर्म कंपनीस मिळाला, तरी शहराच्या दैनंदिन साफसफाईत कुठल्याही प्रकारची तडजोड स्विकारणार नाही हे नगराध्यक्षांनी सदर ठेकेदारास भर सभेत सुनावले होते. मात्र त्यावेळी राजकारण करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी बहुमताच्या जोरावर सुधर्म कंपनीच्या ठेकेदारास शहरातील सफाईचा ठेका दिला. महिन्या भरातच सुधर्म कंपनीने आपले रंग दाखवण्यास सुरवात केली, आणि हा ठेका परवडत नसल्याचा दृष्टांत सदर कंपनीस रात्रीतून झाला, मग काय ठेकेदाराने सदर ठेका परवडत नाही म्हणून पालिकेला पत्र दिले, त्यावरून नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्व साधारण सभेत, विरोधकांनी गदारोळ करीत नगराध्यक्षांना कैचीत धरण्याचा प्रयत्न केला होता.

जाहिरात - 5


मात्र ठेका देण्यावेळी ज्यांनी फायद्याची भाषा केली,शहरात घनकचर्‍याच्या ठेक्याबाबत संभ्रम निर्माण केला त्यांचे दात त्यांच्याच घशात घालण्याचे काम नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले. सुधर्म कंपनीस ठेका मंजूर करतेवेळेसच शहराच्या भल्यासाठी आणि कामगारांच्या हिता करिता, मी विरोध करीत होते, मात्र आता सदर ठेकेदाराने काम बंद करण्याचे लेखी दिल्याने, शहराच्या वाटोळे ज्यांना करायचे आहे, त्यांचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. पण हे मी होऊ देणार नाही शहराच्या भल्यासाठी जे करावे लागेल ते मी नक्कीच करेल.गावच्या भल्यासाठी लढून देखील, विरोधकांचे रडगाणे सुरू आहे,हे सर्व शहरातील सुज्ञ नागरिक जाणून आहेत. काही असंतुष्ठ आणि समदुःखी लोकांची पोटदुखीचे कारण वेगळे असून त्यांना नागरिकांना सुविधा पुरविण्यापेक्षा स्वहित साधणे महत्वाचे असल्याचे मत, नगराध्यक्षा यांनी व्यक्त केलं.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close