Advertise -2

 

 

अहमदनगर
चर्चेत असलेला विषय

घोगरगाव ग्रामपंचायत रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात आमरण उपोषणाचा इशारा

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

नेवासा तालुक्यातील घोगरगाव मधील आंबेडकर रस्त्यावरील असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून आदेश होऊन ही या प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी, राष्ट्रपुरुषांच्या झेंडा कचरा कुंडीत लावून त्यांचा अपमान करणारे साहेबराव कणगरे, अरुण बबन कणगरे, संजय बंसी कणगरे,रोहिदास बबन कणगरे,बाबासाहेब भगवान कणगरे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी व बेकायदा धंदा करणाऱ्यांना पाठीशी घालणारे व अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी घोगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शिरसाठ यांनी केली असून दि. ५/१०/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमारण उपोषणास बसणार आहे.

Shrirampur Ads


त्याबाबत जिल्हाधिकारी ,तहसीलदार नेवासा ,गटविकास अधिकारी नेवासा, उप कार्यकारी अधिकारी जि .प .(ग्रा.प.) अ . नगर,पोलीस निरीक्षक नेवासा यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शिरसाठ तसेच सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत साळवे, प्रसाद सातुरे, संजय भाऊ सातूरे, सुनील दादा धीवर आदींच्या उस्थितीत या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त केला.

जाहिरात - 5

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close