Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात कांदा व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या प्लॉट

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर:-पणन संचालकांची परवानगी न घेता श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकऱ्यांनी काही कांदा व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या प्लॉट दिल्याची तक्रार संचालक सचिन गुजर यांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली आहे.

LA- belle spa salon & academy

बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. न्यायालयाने सध्या त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला आहे. मात्र, या कालावधीत त्यांनी आपल्या मर्जीतील काही व्यापाऱ्यांना बाजार समितीची मोक्याची जागा दिली.

Shrirampur Ads

बाजार समितीच्या जागांची परस्पर अशा प्रकारे विल्हेवाट लावण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यासाठी पणन संचालकांची परवानगी आवश्यक आहे.

जाहिरात - 5

मात्र, तसे करण्यात आले नाही. या जागेचे हस्तांतरण थांबवावे, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, सहायक निबंधक काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close