नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात 35 कोरोनाबधित;बाधितांचा आकडा 2372 वर

जाहिरात - Todays Offer

15 ऑक्टोबर:-श्रीरामपूर तालुक्यात काल 35 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 98 जणांची रॅपीड टेस्ट तर खासगीत 48 जणांची तपासणी करण्यात आली असून यात जिल्हा रुग्णालयात 18, खासगीत 9 तर रॅपीडमध्ये 12 असे 35 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

LA- belle spa salon & academy

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2372 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 48 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 35 जण उपचार घेत आहेत.

advertise- 7

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल 98 जणांची रॅपीड टेस्ट तर खासगीत 48 जणांची तपासणी करण्यात आली यात 12 जण पॉझियिव्ह आढळून आले आहेत. तर 107 जणांचे अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत. यात 10 जणांमध्ये वॉर्ड नं. तीन -1, वॉर्ड नं. चार-1, बेलापूर बुद्रुक-6, खानापूर 1, निमगाव खैरी-2, टाकळीभान 1 या ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.

जाहिरात - 5

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 7199 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2372 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. काल येथील 3 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close