नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

आठवडी बाजार आजपासून सुरू

जाहिरात - Todays Offer

राज्यातील ग्रंथालय, आठवडी बाजार आज, गुरुवारपासून सुरू होत आहेत. याशिवाय मेट्रो रेल्वे सेवा रुळावर येत आहे. सरकारी आणि खासगी ग्रंथालय सुरू करण्यासाठीची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे.

LA- belle spa salon & academy

ग्रामीण भागातील आठवडी बाजार आणि जनावरांचे बाजारही उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट क्षेत्रात मात्र याची परवानगी असणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले ग्रामीण भागातील व्यवहार सुरू होणार असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

advertise- 7

दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन सरकारने मंदिरे तूर्तास न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ती उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील उद्योग व्यवसाय बंदच राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील. मात्र,पदव्युत्तर व संशोधनात्मक शिक्षणासाठी पीएच.डी. विद्यार्थ्यांना ग्रंथालयांचा वापर करण्याची मुभा देण्यात देण्यात आली आहे.

जाहिरात - 5

दुसरीकडे, शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीसाठी शाळांत ५० टक्के शिक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे नियम पाळून सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्रात मात्र ती इतक्यात सुरू होणार नाहीत. मनोरंजन केंद्रे सुरू करण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे.

  • ५० टक्के शिक्षकांच्या उपस्थितीला परवानगी
  • मंदिरे, चित्रपटगृहे बंदच राहणार
  • कंटेन्मेंट क्षेत्रात मात्र परवानगी नाही

टॅग्ज
Advertisement

एक टिप्पणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close