नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरकरांची दसरा-दिवाळी होणार गोड

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर : शहर व तालुक्यातील रुग्णालयांमधील बेड आता मोठ्या प्रमाणावर रिकामे झाले आहेत. बुधवार अखेर रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण २७९ बेड्समध्ये तब्बल २३१ बेड्स आता रिकामे झाले आहेत.

LA- belle spa salon & academy

त्यामुळे श्रीरामपूरकर यांची चिंता आता दूर झाली असून दसरा-दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे.कोरोना रुग्णांची संख्या घटताच सरकारी आणि खासगी सप्टेंबर महिन्यापर्यंत रुग्णालयांमध्ये बेड मिळविण्याकरिता रुग्णाच्या कुटुंबीयांना कसरत करावी लागत होती. शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नव्हते.

advertise- 7

त्यामुळे अनेकांना नगर,पुणे, नाशिक व औरंगाबाद येथे उपचारासाठी जावे लागत होते. ऑक्टोबर महिन्यात मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता सर्वत्र मोठ्या प्रमाणावर बेड रिकामे झाले.आहेत.

जाहिरात - 5

दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. हा दर आता जिल्हामध्ये ९४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. त्याचबरोबर जलद चाचण्यांमध्ये मिळून येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. शिरसगाव हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवले जाते. तेथे सध्या केवळ २८ रुग्णांना ठेवण्यात आले आहे. ही संख्यादेखील लवकरच कमी होईल, अशी शक्यता आहे.

कोरोना रुग्णांचे २३१ बेड रिकामे : बरे होण्याचा दर ९४ टक्के, चिंता झाली दूर, मोठ्या प्रमाणावर बेड झाले रिकामे

  • संत लूक– एकूण बेड्स 100 , शिल्लक बेड्स 100, उपचार सुरु 0
  • ग्रामीण रुग्णालय- एकूण बेड्स 50 ,शिल्लक बेड्स 41, उपचार सुरू 09
  • मोरगे रूग्णालय- एकूण बेड्स 30,शिल्लक 03, उपचार सुरू 27
  • अल्फा – एकूण बेड्स 39, शिल्लक बेड्स 38, उपचार सुरू 1
  • साई सेंटर– एकूण बेड्स 28, शिल्लक बेड्स 19 , उपचार सुरू 9
  • साई शीतल– एकूण बेड्स 32, शिल्लक बेड्स 30, उपचार सुरु 02

एकूण बेड्स 279

शिल्लक बेड्स 231

उपचार सुरू 48

माझे कुटुंब माझी जवाबदारी अभियान सध्या सुरू आहे. यात ज्येष्ठ व जुन्या आजाराच्या रुग्णांवर लक्ष केंद्रित केल्यास कोरोना आटोक्यात येईल. रुग्ण कमी झाले म्हणून प्रशासन मात्र कुठेही गाफील नाही.

प्रशांत पाटील,
तहसीलदार, श्रीरामपूर.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close