नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

अहमदनगर
चर्चेत असलेला विषय

दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुली राहणार

जाहिरात - Todays Offer

15 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातीलग्रंथालय, आठवडे बाजार, जनावरांचे बाजार, उद्याने सुरू करण्यासोबत दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणार आहेत.दुकानांची वेळ याआधी 7 पर्यंत होती. राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी काढले आहेत. शाळा, महाविद्यालये, जीम मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

LA- belle spa salon & academy

मिशन बिगीन अंतर्गत राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. याआधी फिरण्यावर रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बंदी होती. त्यातही एक तास ढील देण्यात आली असून रात्री 10 ते पहाटे पाच पर्यंत फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

advertise- 7

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद राहणार आहे. यासह प्रतिबंधात्मक भागातील शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी असून त्यांना ऑनलाईन शिक्षण देता येणार आहे. असे असले तरी शाळा, महाविद्यालये, जीमला मात्र बंदीच आहे.

जाहिरात - 5

जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य शासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण सुरू राहणार आहे. यासह खासगी आणि शासकीय ग्रंथालय हे सुरू करण्यास परवागी देण्यात आली असून गार्डन, उद्यान आणि सार्वजनिक मोकळ्या जागा करमणुकीसाठी खुली करण्यात आली आहेत. यासह व्यावसायिक प्रदर्शन भरविण्यास मात्र मान्यता देण्यात आली आहे. बिझनेस टू बिझनेस असे प्रदर्शन भरविण्यास परवानगी असेल, असे आदेशात म्हटले आहे.

यासह आठवडे बाजार, जनावरांचा बाजार सुरू होणार असून बाजार पेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी दुकानांना सकाळी 9 ते रात्रीपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवासी यांना सामाजिक आंतर पाळण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. यासह नागरिकांनी गरज असल्यास घराच्या बाहेर पडावे, शक्यतो घरूनच काम करावीत, अशा सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहे.

ही मर्यादा कायम

जिल्ह्यात लग्न समारंभाासाठी जास्ती जास्त 50 लोकांनी उपस्थित राहावे आणि अत्यंविधीसाठी 20 लोकांची उपस्थितीचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. याठिकाणी गर्दी न करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, मास्कचा वापर न करणारे यांच्यावर कारवाईचा इशारा कायम आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close