नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूरात कांदा पोहोचला पन्नाशीवर

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर : येथील बाजार समितीत बुधवारी कांद्याचे भाव क्विंटलला पाच हजार रुपयांवर पोहोचले. वर्षभरातील हा सर्वाधिक भाव ठरला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LA- belle spa salon & academy

समितीत बुधवारी सात हजार ७७० कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याचे बाजार भाव तेजीत राहिले. सर्वाधिक भाव ५ हजार रुपये क्विंटल निघाले. पावसामुळे आवक मंदावली असून त्यामुळे बाजारभावात तेजी राहील असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. उच्च प्रतिचा कांदा चार ते पाच हजार, दुय्यम प्रतिचा अडीच ते तीन हजार ८५०, हलका ६०० ते अडीच हजार व गोल्टी कांद्याचे भाव अडीच ते तीन हजार ८०० रुपये प्रति क्विंटल निघाले.

advertise- 7

कांद्यास आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यातून मागणी आहे. कांद्याचे सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी लिलाव होतात. बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारामध्ये मंगळवारी कांद्याची अडीच हजार गोणी आवक झाली. ते उच्च प्रतीच्या मालाला सहा हजार रुपये भाव मिळाला.

जाहिरात - 5

दुय्यम माल साडे चार हजार, तर हलका कांदा अडीच ते चार हजार २०० रुपये क्विंटलने निघाले.गोल्टी कांदा साडे तीन ते चार हजार रुपयाने विकला गेला. उपबाजारात आवक कमी असल्यामुळे तेथेही भावात तेजी राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तेथे मंगळवार व शुक्रवारी लिलाव होतात.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close