नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

लव श्रीरामपूर’ संकल्पनेमुळे पालिकेचे नाव राज्यात आघाडीवर असेल – आ. जगताप

जाहिरात - Todays Offer

लव श्रीरामपूर’ ही नविन संकल्पना शहराच्या लोकप्रिय नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी मांडली.यामुळे राज्याच्या सर्व नगरपालिकांचा जेव्हा चर्चा होईल तेव्हा श्रीरामपूरच्या नगरपलिकेचे नाव सर्वात आघाडीवर असेल, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

LA- belle spa salon & academy

बेलापूर रोडवरील कॅनॉल कॉर्नरला ‘लव श्रीरामपूर’ या नगराध्यक्षा अनुराधाताई यांच्या संकल्पनेतून उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष कपील पवार, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस गजेद्र भांडवलकर, अहमदनगर महापालिकचे नगरसेवक प्रकाश भागानगरे, पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, तालुका पोलीस मसुद खान, नगरसेवक राजेंद्र पवार, मुख्तार शाह, रईस जाहागिरदार, दीपक चव्हाण, अल्तमश पटेल, कलीम कुरेशी, अर्चनाताई पानसरे, सुनीता धुमाळ, श्लाका आदिक, जयश्री नवले, कैलास बोर्डे, लकी सेठी, सचिन पवार, योगेश जाधव, मल्लू शिंदे, सोहेल शेख (दारुवाला), हर्षल दांगट, बाबासाहेब काळे, राहुल बोंबले, रवि गरेला, गुरुचरण भटियाना, उत्तमराव पवार, बाबासाहेब उपाध्ये ,गणेश ठाणगे, हसंराज आदिक, जयंत चौधरी, सुनील थोरात, भाऊसाहेब वाघ, तैफिक शेख, अर्जुन आदिक, ऋषिकेश डावखर, सैफ शेख, अमजद पठाण, विलास ठोंबरे, निखील सानप,गोपाल वायंदिशकर, सागर कुर्‍हाडे, गुरुचरण भटियाणी, भागचंद औताडे, रोणीत घोरपडे, नयन गांधी, तुषार डोळस, डॉ.विलास आढाव, भाऊ डाकले आदी उपस्थित होते.

advertise- 7

यावेळी आमदार जगताप म्हणाले की, जब तक चाँद सुरज रहेगा तब तक आय लव श्रीरामपूर नाव राहणार आहे. स्व. खासदार गोविंदराव आदिक यांचे स्वप्न आदिक भाऊ व बहिण पूर्ण करतील, असा आपणास विश्वास आहे.

जाहिरात - 5

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या , लव श्रीरामपूर या संक्लपनेत कुठलेही राजकारण नाही सर्व पक्षांना बरोबर घेऊन काम करत आहे. सुंदर शहर स्वच्छ शहर असले पाहिजे यासाठी आपण सर्व एक आहोत, कुठलाही पक्ष नाही ही भावना शहरवासियाच्या मनात आली पाहिजे. असे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी पालिकेचे मुख्य लेखापाल रमेश निकाळजे, उपमुख्याधिकारी हेमंत कविटकर, लेखपाल प्रकाश जाधव, संजय शेळके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्ज
Advertisement

2 टिप्पण्या

  1. लव गैरसोयी-लव खड्डे
    खड्डे आणि बाकीच्या गैरसोयी पण राज्यात पालिकेचं नाव काढतील.

  2. श्रीरामपूरकरांना लव श्रीरामपूर ची गरज काय श्रीरामपूर च्या रस्त्यांची जी वाट लागली आहे ते आधी नीट करा पालिकेचा पैसा आधी रस्ते आणि गटारीसाठी वापरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close