नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूर शहरातील दुकाने रविवारी पूर्ववत सुरू ठेवावेत

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपुर:-शहरातील दुकाने व बाजारपेठ दसरा, दिवाळीसणामुळे रविवारी बंद न ठेवता पूर्ववत सुरू ठेवावेत,असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल फोपळे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

LA- belle spa salon & academy

करोना संसर्गजन्य रोग प्रतिबंध करण्यासाठी गत 3-4 महिन्यांपासून दर रविवारी स्वंयमस्फुर्तीने व्यापार्‍यांनी बाजार पेठ बंद ठेवावी,असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले होते. या आवाहनास व्यापार्‍यांनी सहकार्य देत प्रतिसाद दिला होता.

advertise- 7

दसरा-दीपावली सणामुळे रविवारचा बंद रद्द करावा, अशी विनंती श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनने नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना शुक्रवारी निवेदन पत्र देऊन केली असता त्यांनी असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन रविवारचा जनता कर्फ्यू मागे घेण्यास मान्यता दिली आहे.

जाहिरात - 5

रविवारी बाजारपेठ सुरू राहील परंतु व्यापार्‍यांनी, ग्राहकांनी व नागरिकांनी करोनाच्या नियमांचे पालन करावे. चेहर्‍यावर मास्क हा बांधलाच पाहिजे, सामाजिक अंतर पाळून सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे.

रविवारचा बंद मागे घेण्यासंदर्भात श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्यावतीने नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना अध्यक्ष विशाल फोपळे, उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, सेक्रेटरी निलेश ओझा, सहसेक्रेटरी अमित कोलते, संचालक वैभव लोढा, प्रविण गुलाटी, नितीन ललवाणी, विलास बोरावके, राहुल मुथा, सुनील गुप्ता, मुकेश कोठारी, दत्तात्रय धालपे, राजेश कासलीवाल यांनी पत्र देऊन समक्ष भेटून विनंती केली होती

टॅग्ज
Advertisement

एक टिप्पणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close