नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

भुसार मालाचे खुले लिलाव सुरु; श्रीरामपूर बाजार समितीने घेतला निर्णय

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर:-कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बहुतांश उद्योग धंदे सुरु झाली आहे. यातच शेतकऱ्यांसाठी एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे.श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान येथील उपबाजारात सोमवार (ता.19) पासुन भुसार मालाचे खुले लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समिती व्यवस्थापनाने नुकताच घेतला आहे.

LA- belle spa salon & academy

त्यामुळे शेतकऱ्यांच्या भुसार मालाला योग्य दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात नेहमीच भुसार मालाची मोठी आवक असते.परंतू आडत व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये लिलाव होत. असल्याने आडत्या देईल तो दर शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत.

advertise- 7

म्हणुन बाजार समितीने लिलाव पध्दतीत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारचे लिलाव खुल्या प्रकारे होणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाची वाहने आवारात रांगेत उभी करावी लागणार आहे.

जाहिरात - 5

यावेळी लिलाव पुकारण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित राहणार आहे. बाजार समितीने घेतलेल्या निर्णयामुळे भुसार आडत व्यापाऱ्यांकडुन होणारी शेतजकऱ्यांशी लुट काही अंशी कमी होणार आहे.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close