नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

खोट्या गुन्ह्यात अटक केलेल्या फादर स्टॅन् स्वामी यांची तात्काळ सुटका करावी

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपुर :-झारखंड (रांची) येथे आदिवासी व गरीब समाजामध्ये सेवा करणारे ख्रिस्ती मिशनरी समाजसेवक फादर स्टॅन् स्वामी यांच्यावर खोटे आरोप करूनत्यांना भिमा कोरेगाव दंगलीत अडकविण्याचा जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असून या घटनेचा श्रीरामपूर तालुक्यातील सर्वपंथिय ख्रिस्ती समाजाच्यावतीने तिव्र निषेध व्यक्त करून या घटनेबाबत श्रीरामपूर प्रांताधिकारी यांच्यावतीने नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले.

LA- belle spa salon & academy

निवेदनात म्हटले आहे की, या अगोदर देखील काही ख्रिस्ती सेवकांच्या सेवेबद्दल संशय व्यक्त करत त्यांच्या सेवा कार्यास बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेमुळे भारतातील तमाम ख्रिस्ती समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे.

advertise- 7

फादर स्टॅन स्वामी हे 83 वर्षीय असून करोना महामारी काळात त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता वाटत आहे. तरीही फादर स्टॅन् स्वामी यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरीत मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी.

जाहिरात - 5

अशी मागणी श्रीरामपूर लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो. गायकवाड, डिस्टीक सुपेरीअर फा. सुभाष त्रिभु्वन, सेंट झेवियर स्कूलचे प्राचार्य फा. टायटस, फा. मायकल, रेव्ह. मधुकर देठे, पास्टर अण्णासाहेब अमोलीक, पास्टर सतीश आल्हाट, पा. रावसाहेब त्रिभूवन, पा. पिटर बनकर ,पा. दिपक शेळके, कनोसाच्या सिस्टर पाकोली, सेंट लुक हॉस्पिटलच्या सि. रिटा, सि.फातिमा. व सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित, उत्तम गायकवाड, विजय त्रिभुवन, विजय शेळके, राकेश दुशिंग, अमोल कदम, बेनिग्ना पवार, शोभा त्रिभुवन, सुर्वणा बागुुल, सौ. लत्ता बनसोडे आदींनी केली आहे.

टॅग्ज
Advertisement

एक टिप्पणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित लेख

Back to top button
Close
Close