नवरात्र उत्सव २०२०
Advertise -2

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

अर्रर्र र्रर्र….गुटख्याची साखळी आता वॉर्ड नं.२ पर्यंत..

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :-तालुक्यातील एकलहरे येथे सुमारे पाऊण कोटींचा गुटखा पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच शहरातील वार्ड 2 मध्ये जवळपास एक लाखाचा गुटखा काल शहर पोलिसांनी पकडला, यामध्ये दोघाजणांना अटक केली असून एक जण पसार आहे.

LA- belle spa salon & academy

पोलिसांनी अश्पाक हबीब पठाण वय-42 राहणार -सुभेदार वस्ती वार्ड नं-2 , सरफराज मुस्ताक मेमन वय -28 वर्षे राहणार -सुभेदार वस्ती वॉर्ड नं-2 या दोघांना अटक केली आहे, तर आयुब पोपटीया (पूर्ण नाव माहीत नाही ) राहणार- कुरेशी मोहल्ला वार्ड नं-2 पसार आहे.

advertise- 7

शहरातील वार्ड 2 मधील गोंधवणी ते मिल्लत नगरकडे जाणाऱ्या रोडवर एक अशोक लेलँड कंपनीचा मालवाहतूक टेम्पो क्रमांक- एम.एच.06 , बी.जी.0452 असा अवैधरित्या गुटखा /पान मसाला व सुगंधी तंबाखूसह मिळून आला .

जाहिरात - 5

त्यामध्ये असलेला 84,528/- रुपयांचा हिरा पानमसाला विमल पान मसाला व त्यामध्ये मिसळण्यासाठी वापरण्याची रॉयल 717 व वी-1 तंबाखू व त्याची अवैधरीत्या वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली वाहन व मोबाईल असा एकूण 4,05,028/- रुपयांचे मुद्देमालासह मिळून आले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील तपास करत आहेत.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close