Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

पोलिस निरीक्षक बहिरट यांच्या अडचणीत वाढ

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपुर: येथील अवैध गुटखा प्रकरणाचा तपास अखेर पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याकडून
काढून घेतला आहे. आता या प्रकरणाचा तपास शिर्डी येथील पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात. आल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील एकलहरे शिवारातील आठवाडी परिसरात पोलिस निरीक्षक बहिरट यांनी छापा घालून एक गोदामातून लाखो रुपयांचा गुटखा जत केला होता.

LA- belle spa salon & academy

गुटख्याची साठेबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केले. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, एकलहरे येथील गुटखा पकडण्याची कारवाई
वादग्रस्त ठरला. यासंदर्भात समाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी नाशिक परिकेत्राचे विशेष पोलिस
महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे बहिरट यांची चौकशी करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेत, अखेर येथील अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिवावकर यांच्या आदेशानुसार, अखेर आज पोलिस निरीक्षक बहिरट यांच्याकडून गुटखा प्रकरणाचा तपास काडून घेतला.

Shrirampur Ads

त्यामुळे पोलिस निरीक्षक बहिरट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दरम्यान अपर पोलिस अधीक्षक डॉ. काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, श्रीरामपुर पोलिस उपअधीक्षक’ राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बहिरट यांनी तालुक्‍यातील एकलहरे येथे छापा घालून ४६ लाखांचा गुटखा जप्त केला होता.

जाहिरात - 5

त्यानंतर पोलिसांनी निमगाव जाळी (ता.संगमनेर) आणि नगर परिसरात विविध ठिकाणी छापेमारी करीत लाखों रुपयांचा अवैद्य गुटखा. सुगंधी तंबाखू.जप्त केली. त्यामुळे गुटखा प्रकरण चर्चेत राहिले आहेत.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close