Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

आ. कानडे म्हणतात, ‘केंद्र सरकारला माघार घ्यावी लागेल’

जाहिरात - Todays Offer

मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.तसेच कामगारांच्या विधेयकावरूनही गदारोळ उठला आहे. या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर सह्यांची मोहीम उघडण्यात आली आहे.या मोहिमेचा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष किरण काळे,

LA- belle spa salon & academy

आ. लहू कानडे, युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर,उपाध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले की, केंद्र शासनाने नुकतेच मंजूर केलेले शेतकरी व कामगार कायद्यामुळे शेतकरी भांडवलदारांच्या दावणीला बांधला जाणार आहे.

Shrirampur Ads

जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून अन्नधान्य वगळल्याने गोर गरीब भूमिहीन लोकांना भांडवलदार ठरवतील त्या दराने अन्नधान्य विकत घेण्याची वेळ येणार आहे. परंतु जनरेट्यापुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागेल. उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व आमदार लहू कानडे

जाहिरात - 5

यांच्या सहकार्याने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शेतकरी व कामगार विरोधी कायद्यला जास्तीत जास्त विरोध करून जनतेच्या तीव्र भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविणार आहे. दरम्यान, ‘केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे.

हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे असा आरोप कामगारांमधून केला जात आहे. त्यामुळे याच्या विरोधात अनेक आंदोलने झाली.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close