मोठी बातमी – गुटखा प्रकरण आणि कॉल रेकॉर्डिंग मुळे तीन अधिकारी खपले गेले.

गुटखा प्रकरणात श्रीरामपूरच्या पोलिसांची उचल बांगडी झाली, आणि त्याच दिवशी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित ढेरे यांची रवानगी मुख्यालयात झाली. दोन्ही ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी नियुक्त केलेत, या दोन बदल्यांपैकी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ढेरे यांच्याशी संबंधीत गर्जे कॉन्स्टेबलचे आणि नगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची जुनी ओळख असल्याचे समजत आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे मध्यंतरी आजारी होते त्यामुळे ह्या पदाचा पदभार दत्ताराम राठोड यांच्याकडे होता, त्या दरम्यान म्हणजे दिनांक १६ ऑक्टोबर रोजी नेवासा पोलीस ठाण्यातील गर्जे या पोलीस कॉन्स्टेबल सोबत राठोड यांचं बोलणं झालं व त्यांची कॉल रेकॉर्डिंग आमच्या हाती आली आहे, खाली दिलेले क्लिप ऐका..
दरम्यान आजारपणातून बरे होऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील हजर झाले व त्यांनी चौकशी अहवाल सादर केला, राठोड यांच्यावर कारवाईचे अधिकार डी.जी. ऑफिसरला आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. त्यांच्याकडून नगरचा चार्ज काढून घेण्यात आला आणि त्यांना सध्या कोठेही पोस्टिंग देण्यात आली नाही.
त्याचबरोबर कॉन्स्टेबल गर्जे, नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित ढेरे, तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांचावर चौकशी चालू आहे.