Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

सराफाकडून महिलेची 9 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :-दागिने ठेवा आणि प्रत्येक महिन्याला एका तोळ्यामागे एक हजार रुपये मिळवा. अशा फसव्या योजनेत येथील एका सराफाने कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका महिलेची 9 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक़ास ताब्यात घेतले असून एक जण पसार झाला आहे.

LA- belle spa salon & academy

येथील वैष्णवी अलंकार गृहाने कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे ज्वेल गोल्डी योजनेचे आमिष दाखवून सोने जमा करून एका तोळ्यामागे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देण्याचे सांगितले. त्यामुळे फसव्या योजनेत 29 तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

Shrirampur Ads

प्रारंभी काही दिवस योजनेचा लाभ मिळत गेला. पुढे करोनाने संबंधित सराफाचे दुकान बंद पडल्याने योजनेचा लाभ न देता थेट लाभाच्या रक्कमेचे वाढीव सोने देणार असल्याचे सांगितले. परंतु अशा फसव्या योजनेत सुमारे 9 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक झाली असून कोकमठाण येथे वैष्णवी अलंकार गृहाच्या सोने ठेवा पैसे मिळवा योजनेत चार वर्षांपूर्वी सहभाग घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

जाहिरात - 5

याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, परीक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी आज घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कोकमठाण येथील योगीता पवार हिने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बाळासाहेब डहाळे, अक्षय डहाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी बाळासाहेब डहाळे यांना ताब्यात घेतले असून त्यांचा मुलगा पसार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील करीत आहेत.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close