Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूरात विना मास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करणार!

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी आयपीएस अधिकारी आयुष नोपानी यांनी कर्मचार्‍यांना विशेष सूचना देऊन परिसरात विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करावी, या आदेशानुसार हरेगाव फाटा पोलीस निवारा कक्ष येथे पोलिसांची मोहीम सुरू असून मास्क न वापरणार्‍या व्यक्तींना समज देण्यात येऊन शासकीय दंड वसूल करण्यात येत आहे तसेच शासकीय नियमावलीची जनजागृती मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय दुधाडे यांनी दिली.

LA- belle spa salon & academy

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथून श्रीरामपूरकडे अनेक नागरिक विनामास्क ये जा करत असतात. शासकीय आदेशाप्रमाणे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळावा म्हणून शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीदेखील नागरिक स्वतः बरोबर आपल्या घरच्यांचीही काळजी घेत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

Shrirampur Ads

सध्या श्रीरामपूर शहरात नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग नव्याने नियुक्त झालेले श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी आयपीएस अधिकारी आयुष नोपानी यांनी कर्मचार्‍यांना विशेष सूचना देऊन परिसरात विना मास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे करोना आजाराचा प्रादुर्भाव व संक्रमण टाळण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत.

जाहिरात - 5

सध्या वरिष्ठांच्या आदेशानुसार हरेगाव फाटा पोलीस निवारा कक्ष येथे पोलिसांची मोहीम सुरू असून मास्क न वापरणार्‍या व्यक्तींना समज देण्यात येऊन शासकीय दंड वसूल करण्यात येत आहे. तसेच शासकीय नियमावलीची जनजागृती मोहीम सुरू आहे. तरी परिसरातून नागरिकांनी मास्क लावूनच प्रवास करावा तसेच शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री. दुधाडे यांनी केले आहे. त्यासाठी त्यांना पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पवार सहकार्य करत आहेत.

टॅग्ज
Advertisement

एक टिप्पणी

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close