Advertise -2

 

 

अहमदनगर
चर्चेत असलेला विषय

अन्यथा १ डिसेंबर रोजी रेल्वे रोको आंदोलन

जाहिरात - Todays Offer

शिर्डी-श्रीरामपूर प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ११ वरील चितळी रेल्वे भुयारी पुलाखाली गेल्या सहा महिन्यापासून पाणी साचते. या पाण्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वारंवार बंद पडत आहे.याप्रश्नी नागरिकांनी अनेकदा मागणी करुन रेल्वे विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने हा प्रश्न महिनाअखेर मार्गी न लागल्यास १ डिसेंबर रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा

LA- belle spa salon & academy

इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरी रेल्वे मार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी भुयारी पुलाच्या माध्यमातून वाहतुकीचा मार्ग कायमस्वरुपी खुला करण्याचा रेल्वे विभागाचा हेतू चांगला होता. परंतु सदर रेल्वे मार्गावर भुयारी पुलाचे खोदकाम करीत असताना या ठिकाणी जमा होणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी खोदण्यात आल्या. पावसाचे पाणी

Shrirampur Ads

भुयारी पुलाखाली साचल्यानंतर हे पाणी सदर विहिरीमध्ये जाण्याऐवजी विहिरीतील पाणी पुलाखाली येत असल्याने रेल्वेच्या दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील भुयारी पुलाचा हेतू पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात चुकीची डिझाईन करणाऱ्या

जाहिरात - 5

अभियंत्यावर कारवाई व्हावी अशी ठिकठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे.चितळी रेल्वे भुयारी पुलाखाली किमान पाच फूट पाणी साचत असल्याने हा प्रमुख जिल्हामार्ग वारंवार वहातुकीसाठी बंद होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी या विभागाचे खासदार

सदाशिव लोखंडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर रेल्वे विभागाच्या सोलापूर व अहमदनगर विभागाकडे लेखी तक्रारी केल्या. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चितळी रेल्वे भुयारी पुलाला समक्ष भेट देऊन पाहणी केली.

पुलाखालील पाणी झिरो पॉईंटने सिमेंट पाईपलाईनने काढण्याबाबत दोन वेळेस सर्व्हें झाला. परंतु रेल्वे विभागाचे अधिकारी याप्रश्नी गंभीर नसल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा १ डिसेंबर रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close