Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

विकास कामांच्या प्रदीर्घ चर्चेने पाडवा संपन्न : आमदार लहू कानडे

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात नुतन जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भोसले यांच्यासोबत आमदार लहू कानडे त्यांनी सविस्तर चर्चा केली. दिनांक 15 11 2020 रोजी जिल्हाधिकारी श्रीरामपूर येथे मुक्कामी आले असता त्याच रात्री लोकप्रतिनिधींशी संपर्क करून सकाळची भेट निश्चित केली. तत्पूर्वी नुतन जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर नगर परिषदचे कार्यालय, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छतेचे प्रश्न तसेच नाट्यग्रह,स्टेडियम आदी अपूर्ण कामांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.आमदार लहू कानडे यांनी खंडकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अण्णासाहेब थोरात इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यासोबत जमीन वाटपाची सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकार्‍यांना सदरचा प्रश्न चांगला माहीत असल्याने आपण तातडीने सदरची कामे संपवू असे स्पष्ट केले.
आकारपडीत जमिनीचा संपूर्ण इतिहासच आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कथन केला आणि संबंधित गावातील शेतकऱ्यांचा जमीन परत मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या असल्याने

LA- belle spa salon & academy

याबाबत सकारात्मक अहवाल शासनाकडे जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.नगरपालिकेच्या प्रश्नाबाबत चर्चा सुरू असताना आमदार कानडे यांनी सर्व संबंधितांना जे प्रश्न नगरपालिकेचे अधिकारी पदाधिकाऱ्यांना जटिल वाटतात ते त्यांनी मोकळेपणाने लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे आणावेत असे आवाहन केले. शिवाय नाट्यगृहाच्या प्रश्नाबाबत देखील अतिक्रमण तात्काळ हटवून एन ओ सी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा असे सुचवले. जिल्हाधिकाऱ्यांनीही नगरपालिकेनेच सदरचे अतिक्रमण काढून टाकावेत आदेश दिले. शहरवासीयांना पिण्यासाठी मिळणारे पाण्याची दुर्गंधी येत असल्याचा प्रत्यक्ष भेटीतील अनुभव जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याशी शेअर केला व तातडीने त्यावर उपाय योजना करावी अन्यथा

Shrirampur Ads

काविळची मोठी साथ उद्भवेल याची जाणीव करून दिली.
कामगार पुढारी कॉम्रेड सुरूडे यांनी आमदार लहू कानडे यांच्यामार्फत नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेनेच एक सक्षम एजन्सी म्हणून सदरचे काम करायला हवे असे ठामपणे सांगितले. नगरसेवकांच्या बैठकीमध्ये एस्टिमेट व तांत्रिक मान्यता नसताना सफाई कामाचे टेंडर फ्लोट झाल्याची गंभीर गोष्ट निदर्शनास आली. आमदार कानडे यांनी सदरच्या कार्यपद्धतीबाबत नगरपालिका प्रशासनाबद्दल नापसंती व्यक्त केली, तर जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही कामाचे टेंडर करण्यापूर्वी सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन अंदाजपत्रक करायला हवेत व नंतरच टेंडरची कार्यवाही करावी म्हणजे मधूनच काम टाकून ठेकेदार पळून

जाहिरात - 5

जाण्याचे प्रसंग निर्माण होणार नाहीत अशी दक्षता घेण्याचा सल्ला दिला. श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक आयुष्य निपोन आणि प्रांताधिकारी अनिल पवार तसेच मुख्याधिकारी डेरे यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांसोबत शहर व गावो गावचा जागेचा प्रश्न गंभीर असल्याने याबाबत शासन निर्णयानुसार नियोजनपूर्वक काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली. शहरात व खेड्यात जागा उपलब्ध नसल्याने गोरगरिबांची मंजूर घरे रद्द होतात त्यासाठी स्वमालकीच्या घर नसणाऱ्या लोकांना ते अतिक्रमण करून दीर्घकाळापासून रहात असलेल्या जागा नियमानुकूल करून देण्याची मोहीम त्वरित हाती घेण्याची विनंती केली. 2022 पर्यंत श्रीरामपूर मतदार संघातील प्रत्येकाला स्व मालकीचे घर देण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने घरकुल बांधण्याची योजना गतिमान करण्याची आवश्यकता आमदार कानडे यांनी प्रतिपादन केली.

यावर जिल्हाधिकारी भोसले यांनी सोलापूर येथे जिल्हाधिकारी असताना आमदार आडम मास्तर यांच्या कल्पनेतून आलेली 10 हजार व 30 हजार घरांची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण स्वतः योगदान दिल्याचे आवर्जून नमूद केले. त्याच अनुभवाच्या आधारे आपला घरकुलांचा ड्रीम प्रोजेक्ट ही पूर्णत्वाला नेऊ असे सांगितले. आमदार कानडे यांनी गावठाण हद्दवाढबरोबरच संबंधित जमिनींचे प्रश्‍न व शेती महामंडळाकडील प्रलंबित प्रश्‍न यावर देखील चर्चा केली. जिल्हाधिकारी श्री भोसले यांनी सकाळपासून दुपारपर्यंत आवर्जून वेळ देऊन श्रीरामपूर शहराची पाहणी केली व तालुक्यातील विकासकामांवर अत्यंत सकारात्मक चर्चा केली. याबद्दल त्यांचे आमदारांनी आभार मानले.

याप्रसंगी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाने, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पाटील थोरात, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, सतीश बोर्डे, कॉ. जीवन सुरूडे, अनेक नगरसेवक आणि सेंट लूक हॉस्पिटल चे पदाधिकारी अशा अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close