Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात 3 शिक्षकांसह 3 जण पॉझिटिव्ह

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर:- तालुक्यात काल केवळ 6 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात तीन शिक्षकांचा समावेश आहे.श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 64 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली त्यात 05 पॉझिटिव्ह तर 59 निगेटिव्ह आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळेतील 01 असे 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

LA- belle spa salon & academy

यात कोपरगाव येथील शिक्षकाने येथे तपासणी केली असता ते शिक्षक तसेच उक्कलगाव व अशोकनगर येथील प्रत्येकी एक असे तीन शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 2749 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 01 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Shrirampur Ads

श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 15 जण उपचार घेत आहेत. 1 रुग्णास दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 10237 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2749 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close