Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

कोरोना रुग्णांच्या वाढीबद्दल काळजी वाटते : आमदार लहू कानडे

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :-दिवाळीचा सण, शिथील झालेली बंधने आणि लॉकडाऊन मुळे दिर्घकाळ एकाकी राहिलेले जीवन खरेदीच्या निमीत्ताने रस्त्यावर आले. मंदिरे खुली झाल्याने अधिकच गर्दी उसळली आणि सारे जनजीवनच एकमेकांच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले. या सर्वांचा परिणाम म्हणून कोरोना पेशंटच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली त्यातच शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे कोविड-१९ च्या तपासण्या वाढताच अनेक शिक्षकही पॉझिटिव्ह आढळून येऊ लागले. दिवाळी सणाच्या निमीत्ताने श्रीरामपूर शहरामध्ये अभुतपुर्व गर्दी बघावयास मिळाली. या सर्वांचा

LA- belle spa salon & academy

परिणाम म्हणून कोरोना रुग्णसंख्याही वाढली प्रसारमाध्यमांमधून दुस-या लाटेचं भाकीत केले जात असतांनाच आमदार लहू कानडे यांनी या सर्व परिस्थितीबाबत सर्व अधिका-यांना एकत्र करुन आढावा घेतला आणि कोरोना साथीबद्दल चिंता व्यक्त केली. बेलापूर रोडवरील आमदार कार्यालयामध्ये या बैठकीसाठी पोलीस उपविभागीय अधिकारी संदिप मिटके, प्रोबेशनरी पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, तहसिलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्याधिकारी मोहन शिंदे, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डेरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नितीन गुजरे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते आमदार लहू कानडे यांनी

Shrirampur Ads

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिक मास्क वापरत नाहित, सोशल डिस्टन्गिचा तर पार फज्जा उडाला आहे. रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या वाढते आहे यातून पुन्हा मोठ्या प्रमाणावर साथीचा फैलाव होऊ नये म्हणून मास्क वापरणे तातडीने बंधनकारक करावे, तसेच बाजारपेठेतील दुकानदार व कामगार यांच्या कोरोना चाचण्या करुन घ्याव्यात. जेवढे लवकर निदान होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सुविधा आपल्याला गरीब माणसाला देता येतील. ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत उपचाराची सोय झाल्याने चाचणी करुन घेण्यासाठी नागरिकांनी घाबरु नये असा संदेशही जनतेमध्ये गेला पाहिजे. अशा प्रकारच्या सुचना सर्व अधिका-यांना दिल्या

जाहिरात - 5

तालुका प्रशासनाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतानाच बेकायदेशीर गोष्टी धीटपणे मोडून काढल्या पाहिजेत आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार कानडे यांनी केले. नगरपालिकेच्या अनेक प्रश्नांबाबत जिल्हाधिका-यांसोबत चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये ठरलेले विषय पुर्णत्वास गेले पाहिजेत, विशेषतः नाट्यगृहाच्या जागेवरील अतिक्रमण व इतरही मोक्याच्या जागेवरील अतिक्रमणे नियम आणि कायदे पाळून दूर केले पाहिजेत अशा सुचना केल्या.

शासनाने सन २०२०-२१ चे अंदाजपत्रकावरील बंधन दुर केले आहे. तसेच विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही उपलब्ध करुन दिला आहे यासाठी आपल्या तालुक्यासाठी प्राप्त झालेली सर्व योजनांची उद्दीष्टे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवाय नवनवीन प्रकल्प व योजनांचे नियोजन करुन सादर करावेत व पाठपुराव्यासाठी मला अवगत करावे अशाही सुचना केल्या. संपुर्ण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामे सुरु करण्यात आली आहेत सर्व अधिका-यांनी सदरची कामे दर्जेदार होतील यासाठी योग्य पध्दतीने लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close