Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात विविध विकास कामांना सुरुवात- अनुराधा आदिक

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर:- शहरातील सर्वच प्रभागातील विविध विकास कामाना सुरवात होत आहे. प्रभाग ९ मधील विकास कामाचे काल शुभारंभ झाला असुन, यापुर्वी या प्रभागातील कामे झाले असल्याचे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.

प्रभाग ९ च्या नगरसेविका तरन्नुम रईस जहागिरदार यांच्या प्रभागातील विविध विकास कामाच्या शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते झाला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रईस जहागिरदार, नगरसेवक कलीम कुरेशी, मुक्तहार शहा, बरकत अल्ली, अ‍ॅड.ए.पी.परदेशी, अ‍ॅड.भालेराव, अनिकेत शिरसाठ, डॉ.सकलेचा, रफिक जहागिरदार, सलिमभाई दुधवाले, पठाण सर,कामगार नेते अ‍ॅड. जिवन सुरडे, चंदु फापाळे,अ‍ॅड.ऋुषिकेश बोर्डे, एकनाथ डोळस,अक्षय काळमेक, यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Shrirampur Ads

यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाले की, शहराच्या विकासासाठी करोना संसर्गमुळे गेले नऊ महिन्यापासुन शासनाकडुन निधी उपलब्ध नसल्याने विकास कामे थाबली होती; आता विकास कामाना प्रारंभ झाला आहे. लवकरच शहरातील विविध भागातील विकास कामे सुरू

जाहिरात - 5

होतील असे सांगितले. यावेळी प्रास्तविकात रईस जहागिरदार यांनी प्रभागात यापुर्वी बरेच कामे झाली आहे. आता मिळालेल्या सोहळा लक्ष पन्नास हजार रुपयाच्या विकास कामाना प्रभागात ९ मध्ये प्रारंभ होत आहे. नगराध्यक्षा आदिक यांनी असाच जास्तित जास्त निधी प्रभागस देऊन सहकार्य करावे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अ‍ॅड.ए.पी.परदेशी व आभार अनिकेत शिरसाठ यांनी मानले. 

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close