Advertise -2

 

 

अहमदनगर
चर्चेत असलेला विषय

शाळा सुरू झाल्या पण.. प्रतिसाद कमीच!

जाहिरात - Todays Offer

राज्य सरकारच्या सुचनेनुसार सोमवारपासून (काल) जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या.मात्र, पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने शाळांचे वर्ग रिकामेच असल्याचे दिसले. जिल्ह्यात नववी ते बारावी असे 2 लाख 84 हजार विद्यार्थी असताना पहिल्या दिवशी केवळ 5 हजार 560 विद्यार्थी शाळेत आले. तर 1 हजार 209 शाळांपैकी केवळ 278 शाळा सुरू झाल्या.

कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासनाने दिवाळीनंतर 23 नोव्हेंबरला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे शिक्षकांची कोरोना चाचणी, शाळांचे निर्जंतुकीकरण अशी सर्व तयारी शिक्षण विभागाने केली. परंतु, प्रत्यक्षात सोमवारी शाळांना अल्प प्रतिसाद मिळाला. बहुतांश पालकांनी संमतीपत्रच भरून दिले नाही.

Shrirampur Ads

नगर जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत एकूण 1 हजार 209 शाळा आहेत. त्यातील केवळ 278 (23 टक्के) शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या. हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त होते. दरम्यान, जिल्ह्यात 1209 शाळांवर सुमारे 10 हजार शिक्षक व 5 हजार 965 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यापैकी 7 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असून त्यात 25 शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत.

जाहिरात - 5

महापालिका हद्दीत नववी ते बारावीच्या 79 शाळा असून महापालिका हद्दीत 36 शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये 9 ते 12 वीचे 28 हजार 584 विद्यार्थी आहेत. त्यापैकी केवळ 1 हजार 591 विद्यार्थी पहिल्या दिवशी आले.

पहिल्या दिवशी 11 हजार 412 संमतीपत्र

जिल्ह्यात 2 लाख 85 हजार विद्यार्थी असताना केवळ 11 हजार 412 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र लिहून दिले. त्यापैकीही केवळ 5560 विद्यार्थीच पहिल्या दिवशी शाळेत आले. हे प्रमाण केवळ 2 टक्के आहे. यात राहुरी 594, संगमनेर 350, पारनेर 782, पाथर्डी 256, राहाता 735, राहुरी 594, शेवगाव 986, श्रीगोंदा 156, श्रीरामपूर 873, अकोले 603, नगर 517, नेवासा 1 हजार 921, जामखेड 872, कर्जत 517, कोपरगाव 590 आणि नगर मनपा 2 हजार 667 असे आहेत.

तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा

पारनेर 19, पाथर्डी 18, राहाता 8, राहुरी 15, संगमनेर 3, शेवगाव 17, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 44, अकोले 21, नगर 24, नेवासा 50, जामखेड 9, कर्जत 2, कोपरगाव 6 आणि नगर मनपा 326 शाळा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close