Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात 17 पॉझिटिव्ह; तर 8 जण बरे

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :-तालुक्यात काल 17 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 148 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली. त्यात 14 पॉझिटिव्ह तर 124 निगेटिव्ह आढळून आले. खासगी प्रयोगशाळेतील 03 असे 17 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

काल पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये वॉर्ड नं. एक-1, बेलापूर-2, वॉर्ड नं. सात-4, उंदिरगाव 5, खानापूर-2 असे रुग्ण आढळले. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2776 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 08 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 21 जण उपचार घेत आहेत. 3 रुग्णांस दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले.

Shrirampur Ads

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 10385 जणांची टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2776 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जाहिरात - 5

श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 50 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले. या स्त्रावाचे अहवाल उद्यापर्यंत मिळणार आहेत.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close