Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूरात वाढले 23 कोरोनाबाधित रुग्ण!

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :- तालुक्यात काल 23 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.तालुक्यातील माळेवाडीत 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 171जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली असून यात 16 जण पॉझिटीव्ह आढळून तर 155 निगेटीव्ह आढळून आले.तर खासगीत 07 तर असे 23 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

Shrirampur Ads

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 2799 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 24 जण उपचार घेत आहेत. 3 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले.

जाहिरात - 5

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 10556 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2799 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 54 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले. या स्त्रावाचे अहवाल उद्यापर्यंत मिळणार आहेत.

दुकाने उघडणारे व मास्क न वापरणार्‍यांना दंड ठोठावणार- सरपंच औताडे

श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी गावातील 3 व बाहेरील 1 महिला असे 4 आणि काल दि. 24 रोजी 10 कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामुळे गाव तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून मास्क न वापरणारे व गाव बंद असताना दुकाने उघडे ठेवणार्‍यांना दंड ठोठावणार असल्याची माहिती माळेवाडीचे सरपंच सोपानराव औताडे यांनी दिली. ग्रामीण भागात देखील अनेक महिने करोनाचा शिरकाव होऊ शकला नव्हता. मात्र दीपावलीच्या गर्दीत नियम न पाळल्याने शिरकाव झाला असल्याची माहिती डॉ. सुनील राजगुरू यांनी दिली. 3 दिवसांचा बंद काळात अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही दुकाने उघडी राहणार नाहीत. विना मास्क फिरणार्‍यांकडून कठोर दंडात्मक कारवाई करणार आहे. तसेच जि.प. शाळा, माध्यमिक विद्यालय बंद ठेवणार असून गुरुवारी होणारा आठवडे बाजारही रद्द करण्यात आला आहे. तरी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सोपानराव औताडे यांनी केले.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close