Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

सरकारच्या घोषणेचा मृत्यू, स्मशानभूमीत श्राध्द घालून आंदोलन.

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपुर : लॉकडाऊन मुळे शेतकरी ,छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित – असंघटित कामगार, मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार असे सर्वच जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत, अशा बिकट परिस्थितीत शासनाकडून मदत मिळण्या ऐवजी, ज्यात राज्यातील काही उतावळ्या मंत्र्यांनी मोठ्या तोऱ्यात ‘घोषणा दिली की ५० टक्के विज बील माफ करु” परंतु राज्यातील तीन तोंडी राज्य सरकारने, ५० टक्के विज

बील माफी तर सोडच, पण ग्राहकांना वाढीव वीजबिले देऊन, वीजबिल न भरल्यास, लाईट कनेक्शन कट करण्याची भाषा राज्यातील तीन तोंडी सरकार करत असल्याने, “सिटीझन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र”या पत्रकार संघाच्या आयोजनाखाली श्रीरामपुर येथे सर्व पक्षीयांच्या वतीने हिंदु स्मशानभूमीत, राज्यातील तीन तोंडी सरकारच्या घोषणे’ चे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, या आंदोलनकरिता बनविण्यात आलेली श्राद्धाची पत्रिका, ज्यात कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की,

Shrirampur Ads

राज्य सरकारच्या सुंदर ‘घोषणे चा अपघाती मृत्यु झाला असून, घोषणा मेल्याने उभा महाराष्ट्र हळहळत आहे ,हे दुःख व्यक्त करण्यासाठी सर्व पक्षीय भावपूर्ण श्रध्दांजलीं वाहण्यात आली, तसेच माय बाप सरकार तीन तोंडांचे (पक्षांचे) कोणत्या तोंडाकडे पहावे ? असा सवाल देखील या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलकांनी उपस्थित केलाय. आंदोलना दरम्यान हिंदु प्रथे प्रमाणे पुरोहित राजेंद्र जोशी यांनी श्राद्ध पूजा केली, सदरच्या या आंदोलनास

जाहिरात - 5

सिटीझन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष कामगार नेते नागेशभाई सावंत, राज्य सरचिटणीस राजेंद्र नारायणे, आप चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, शेतकरी संघटनेचे अहमदभाई जाहिगिरदार, वंचीत आघाडी चे चरण त्रिभुवन, डॉक्टर मुठे, आप चे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जोएब जमादार, आशिष परदेशी, बी.एम पवार, भारत जाधव, दानिश शाह, विष्णु भागवत, राजू यादव,आशिष परदेशी,दीपक परदेशी, राहुल रणपिसे, राहुल केदार,किरण गायकवाड, संदेश आजगे, तसेच भरती शिंदे, अंबिका प्रधान,मंदा कसबे,ज्योती राठोड,कुसुम पवार, सिंधू बनकर, लता माळी, शोभा पवार आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close