जे जे फौंडेशन श्रीरामपूरच्या वतीने नगरपरिषदेच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलनाचा इशारा

श्रीरामपूर :-सध्या सर्वसामान्य जनतेला श्रीरामपूरकर नगर परिषदेकडून होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत .आम्ही जे . जे . फौंडेशनचे वतीने समाजातील सर्वसामान्य , तळागाळातील नागरिकांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबवून समाजसेवेचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत सध्या श्रीरामपूर नगर परिषदेकडून जो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे त्याबद्दल आमच्याकडे बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत तसेच तेच पाणी आम्ही देखील वापरत आहोत . एकतर या
पाण्याला चव नाही आणि त्यातच गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांना बेचव पाण्याचा सामना करावा लागत आहे . पाण्याची चव व रंग बदल्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे . येणाऱ्या प्रत्येक दिवशी नळावाटे घाण पाण्याचा पुरवठा श्रीरामपूर नगर परिषदेकडून होत आहे . नगर पालिकेकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर पाणी पुरवठा विभाग पथकाने बेचव पाण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो शोधूनही सापडत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे या दुषित पाण्यामुळे
हाल होत आहेत . त्यातच सध्या कोरोना या महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता , त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर स्वच्छतेसाठी करावाच लागतो . या बेचव पाण्याबाबत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांचेकडे कसलेच समर्पक उत्तर मिळत नाही . करदात्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रीरामपूर नगर पालिका काम करते मात्र सध्यातरी पालिका नागरिकांसमोर समस्याच उभी करत असताना जाणवत आहे . यापूर्वी अशी परिस्थिती यापूर्वी कधी उद्भवल्याचे दिसून आले नाही . तरी या पत्राद्वारे आपणांस कळविण्यात येते की ,
जर या दुषित पाण्याच्या पुरवठ्या बाबत वेळीच योग्य ती सुधारणा तातडीने करावी व स्वच्छ , पिण्यायोग्य पाणी सर्वांना पुरविणेत यावे . अन्यथा नाईलाजाने आम्हाला आमच्या संघटनेद्वारे या विरोधात जनआंदोलन उभे करावे लागेल . त्यात अधिकाऱ्यांना घेराओ , घंटानाद , मोर्चा इ . लोकशाही पध्दतीने विरोध दर्शविला जाईल . त्यात काही
कमी जास्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालीका प्रशासनाचीच असेल याची कृपया नोंद घ्यावी . असे जे जे फौंडेशन च्या वतीने ,जोएफ जमादार, एजाज शाह, आसिफ तंबोली, अय्यूब पठान, अरबाज कुरैशी, शादाब पठान, सोहेल बागवान, दानिश पठान,अनवर तंबोली, गुडडू जमादार, मुबसशीर पठान, मुजाहिद तंबोली, आदिनी केले आहे.