Advertise -2

 

 

श्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

शेतकऱ्यांना कायमस्वरुपी दिवसा वीज पुरवठा करा.-किसान युवा क्रांती संघटनेची मागणी

जाहिरात - Todays Offer

शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना कायमस्वरुपी दिवसा वीज पुरवठा करण्याबाबतची मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तालुकाध्यक्ष योगेश सलालकर व विद्यार्थीआघाडी तालुकाध्यक्ष प्रणव पठारे यांनी उपकार्यकारी अभियंता,बाभळेश्वर यांना निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदनाद्वारे,राज्यात महावितरण कंपनी कडून कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर रात्री पहाटे वीज पंप चालू करण्यास जावे लागते. अशा परिस्थितीत लाईट नसल्यामुळे पेटीतील फ्युज टाकण्यास अडचणी येतात. कधी कधी

पेटीत वीज प्रवाह उतरल्याचा धोका लक्षात येत नाही. तसेच अंधारामुळे साप, विंचू वगैरे पासून पेटीजवळ व रस्त्यावर सतत धोका होत असतो. तर कधी अंधारात वन्य प्राणी शेतकऱ्यांवर प्राण घातक हल्ला करतात व अशा प्राण घातक हल्याच्या देखील अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत.

Shrirampur Ads

नुकताच जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील पळासखेडे या गाव शिवारात कृषी पंपपेटी जवळ वीज प्रवाह उतरल्याने व अंधारात शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे एकाच दिवशी लागोपाठ जाधव कुटुंबातील तीन भावांचा शॉक लागून मृत्यू झाला व संपूर्ण कुटुंबच पोरके झालेले आहे.

जाहिरात - 5

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे वरील जाधव बंधूंच्या मृत्यूस महावितरण कंपनी जबाबदार आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडून शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरू नये व त्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला जाऊ नये, म्हणून कृषी पंपांना तत्काळ दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन व्हावे.

तसेच रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरचा फ्यूज गेल्यास रात्री वीज कंपनीचा कोणीही कर्मचारी उपलब्ध नसतो. त्यामुळे कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा नीट मिळत नाही. त्यामुळे कृषी पंपाना दिवसाच वीज पुरवठा होईल असेच नियोजन करावे. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यास ४८ तासाच्या आत दुरुस्ती किंवा बदलण्याची देखील व्यवस्था करावी, अन्यथा शेतकऱ्यांना यापुढे महावितरण कंपनीच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करणे भाग पडेल, अशा विविध मागण्यांचे निवेदन श्रीरामपुर किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

यावेळी राहाता तालुकाध्यक्ष गणेश राऊत, सुशील कडलग, तसेच अभिषेक सातपुते,महेश शेळके,अजय धनवटे, गणेश चौधरी,संदिप कडलग व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close