Advertise -2

 

 

अहमदनगर

कोरोना : नगर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.29 टक्के

जाहिरात - Todays Offer

जिल्ह्यात आज 42 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 68 हजार 112

इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण (रिकव्हरी रेट) हे आता 97.29 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 109 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 834 इतकी झाली आहे.

Shrirampur Ads

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 47, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 48 आणि अँटीजेन चाचणीत 14 रुग्ण बाधीत आढळले.

जाहिरात - 5

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 08, जामखेड 01, कोपर गाव 03, नगर ग्रामीण 04, पाथर्डी 06, संगमनेर 17, शेवगाव 02, श्रीगोंदा 01, कॅन्टोन्मेंट बोर्ड 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 11, कोपरगाव 01, नगर ग्रामीण 07, पारनेर 02, राहाता 05, राहुरी 01, संगमनेर 05, शेवगाव 01, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 05, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि जिल्हा बाहेरील 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 14 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 01, नगर ग्रामीण 01, नेवासा 04, पाथर्डी 02, राहाता 04, शेवगाव 01, आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा 09, कोपरगाव 08, नगर ग्रामीण 04, पारनेर 01, पाथर्डी 04, संगमनेर 06, शेवगाव 01, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 04 आणि मिलिटरी हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:68112

उपचार सुरू असलेले रूग्ण: 834

मृत्यू:1064

एकूण रूग्ण संख्या:70010

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close