Advertise -2

 

 

श्रीरामपूर

श्रीरामपूर शहरांत होत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या व भुरटया चो-यांचा लवकरात लवकर तपास लावावा…

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध भागात मोटारसायकल. चोरीचे प्रमाण वाढलेले आहे अशा भुऱ्ट्या चोरांचा वेळेत. बंदोबस्त करण्यात यावा. जेणे करुन कष्टाने वै-ये जमा करुन वाहन खरेदी करणा-या गोरगरीब लोकांचे आर्थिक- नुकसान/होणार नाही. गोंधवणी व शहरातील इतर आगांमध्ये मोटारसायकल व इतर छोटय़ामोठय़ा’चोऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असतांना त्या भागातील ‘पोलीस” कर्मचारी १ दिवसा“ व रात्री त्यांचे डयुटीचे वेळेस गस्त घालताना दिसून येत नाहीत यामूळे छोट्या-मोठ्या चो-या’ करणा-या भुरट्या चोरांवर पोलीसांचा वचक राहिलेला नाही म्हणून भुरटे चोर रात्र असो वा. दिवस चोरी करण्याची हिम्मत दाखवत असतात तरी आपल्या’ मार्गदर्शनाखाली चोरी गेलेल्या ‘मोटारसायकलांची कसून तपास करण्यात यावा व चोरी केलेल्या मोटारसायकल सापडत नसल्यास त्या भागातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना जवाबदार धरुन त्यांचेविरुध्द देखील कर्तव्यात कसूर केले म्हणून कारवाई
करण्यात यावी. एक-दोन पोलीसांवर कारवाई झाली तर इतर सर्व पोलीस प्रामाणिकपणाने काम करून खाकीचा धाक भुरट्या चोरांमध्ये निर्माण करतील. यामूळे शहरात होत असलेले दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण घटेल व कष्टाच्या पैशाने घेतलेल्या वस्तुचे संरक्षण पोलीसांकडून होत असल्याने गोरगरीब लोकांचा पुन्हा एकदा पोलीसांवरील विश्‍वास वाढेल व श्रीरामपूर शहरामध्ये देखील शांतता राहिल तसेच यामूळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत आहे असे नागरीकांना वाटेल.

आमच्या निवेदनाची दखल.घेवू्न भूरटया चोरांचा बंदोबस्त येत्या ८-१० दिवसांत न झाल्यास चोरीस गेलेल्या मोटारसायकल धारकांच्या न्याय हक्कासाठी मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल मग होणा-या परिणामास आपण व आपले पोलीस प्रशासन जबाबदार
राहिल या अशाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सुरवुडे यांना दिले आहे.

Shrirampur Ads

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close