Advertise -2

 

 

श्रीरामपूर

श्रीरामपूर हागणदारीमुक्त तसेच थ्री मानांकनासाठी नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात; मुख्याधिकारी

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर शहर हे हागणदारीमुक्त म्हणून तसेच शहर थ्री तारांकित मानांकन दर्जाचे शहर म्हणून घोषित करण्यात येत असल्यामुळे

याबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्यांनी तातडीने पालिकेच्या आरोग्य विभागात नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

Shrirampur Ads

नगरपरिषदेद्वारे शहर हागणदारीमुक्त घोषित करण्याकरिता शासनाने नेमून दिलेल्या सर्व निकषांची अंमलबजावणी होत असल्याने सर्वसाधारण सभेत करण्यात आलेल्या ठरावानुसार शहर हे हागणदारीमुक्त दर्जाचे शहर म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच शहरास तीन तारांकित मानांकन (3 वाफ 21774) घोषित करण्याकरिता आवश्यक असणार्‍या सर्व शासन निर्देशाची नगरपरिषदेद्वारे अंमलबजावणी होत आहे.

जाहिरात - 5

त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार शहर हे 3 तारांकित मानांकन दर्जाचे शहर म्हणून घोषित करण्यात येत आहे. वरील दोन्ही घोषणांकरिता जनतेच्या काही सूचना किंवा हरकती असल्यास दि. 25 जानेवारी 2021 पर्यंत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर करण्यात याव्यात. या मुदतीनंतर हरकती आणि सूचना स्विकारल्या जाणार नसल्याची माहिती मुख्याधिकारी शिंदे यांनी दिली.

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close