ग्रामपंचायतीत मनसेचा विजय, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यात सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Gram Panchayat Election Results) जाहीर झाला. यामध्ये सर्वच पक्षांनी आपल्याला मिळालेल्या ग्रामपंचायतींचा आकडा माध्यमांसमोर सांगितला. मात्र, या आकड्यात शिवसेनेना बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी राहिली. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्र नवर्निमाण सेनेने बऱ्यापैकी कामगिरी केली. मनसेने (MNS) दोन आकडी ग्रामपंचायतीत आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हेही खूश झालेत. त्यांनी आपल्या मनसैनिकांना खास संदेश देताना शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच लवकरच तुमची भेट घेणार असल्याचेही म्हटले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
राज्यात १३ हजारहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. या निवडणुकीतमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्यासाठी एक खास संदेशही दिला आहे. राज्यातील बऱ्यापैकी ग्रामपंचायती मनसेने ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईजवळच्या ग्रामपंचायतीसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.