Advertise -2

 

 

श्रीरामपूर

श्रीरामपुरात आजपासून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :- प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र स्थापना दिवसाचे औचित्य साधून पोलीस व नागरिक यांचेत परस्पर सलोखा वाढीव लागला, राष्ट्रीय एकात्मता,

करोना जनजागृती या हेतूने मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था, श्रीरामपूर व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर, अहमदनगर जिल्हा पोलीस अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली व संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे पुर्णवादनगर या मैदानावर शनिवार दि. 23 ते दि. 26 जानेवारी 2021 पर्यंत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Shrirampur Ads

या स्पर्धेसाठी श्रीरामपूर नगरपरिषद, श्रीरामपूर वकील संघ, श्रीरामपूर महसूल संघ, श्रीरामपूर पंचायत समिती संघ, मेडिकल असोसिएशन संघ, श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन संघ, श्रीरामपूर पत्रकार संघ, श्रीरामपूर श्रीरमपूर महावितरण संघ, श्रीरामपूर प्रध्यापक संघ, श्रीरामपूर पोलीस संघ, संगमनेर पोलीस संघ, शिर्डी, पोलीस संघ, शेवगाव पोलीस संघ, एल. सी.बी. अहमदनगर संघ, ए. एस.पी. पोलीस संघ, श्रीरामपूर, तालुका आरोग्य कोव्हिड वॉरियर इत्यादी संघांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर खेळाडूंना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन बंधनकारक आहे.

जाहिरात - 5

या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी ठिक 9:00 वाजता पुर्णवादनगर क्रिकेट मैदानावर होणार आहे. या स्पर्धेसाठी अप्पर पोलीस अधीक्षक, डॉ. दिपाली काळे, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पो. नि. संजय सानप, पो. नि. मसुद खान, पो. नि. योगेश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, स. पो. नि. जीवन बोरसे, मुकुंद कणसे, रवींद्र चव्हाण, राजू गोडसे, नितीन भालेराव, सचिन धनाड, हबीब पठाण, किशारे हिंगे, सतिश पठारे, शहाबाज पटेल, आकाश भैरट, फुकरान शेख, प्रमोद जाधव, रमेश बेल्हेकर, संजय गडेकर, राहुल कचरे, अमोल रांधवने आदी परिश्रम घेत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close