Advertise -2

 

 

श्रीरामपूर

दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेज टाकणाऱ्या श्रीरामपूरच्या दोघा जणांविरुद्ध कारवाई

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर :-दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मसेज व्हाटसअप ग्रुपवर टाकल्याप्रकरणी शहरातील वॉर्ड नं. 2 मधील दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका मोबाईल ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे मेसेज टाकण्यात आले. याबाबतची माहिती बेलापूर येथील दोघा जणांनी नव्यानेच दाखल झालेले श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोली निरीक्षक संजय सानप यांच्या कानावर ही बाब टाकली. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी त्या मोबाईल ग्रुप अ‍ॅडमिनला बोलावून घेतले व त्याने व्हाटसअपमध्ये टाकलेल्या आक्षेपार्ह व मजकूराबद्दल विचारणा केली असता सदरची पोस्ट ही वॉर्ड नं. 2 श्रीरामपूर येथील दोन तरुणांनी टाकली असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सानप यांनी या दोघा तरुणांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर या दोघा तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व त्यांची चौकशी केली असता ही पोस्ट टाकल्याची कबुली दिली. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखलीपोलीस निरीक्षक संजय सानप यांनी याप्रकरणी माहिती घेवून सदरची कारवाई केली.

Shrirampur Ads

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक श्री. शेख यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 103/2021 प्रमाणे इसरार लतिफ शेख, शरीफ लतीफ शेख (गोपीनाथ नगर) यांच्याविरुध्द भादंवि कलम 505 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close