Advertise -2

 

 

अहमदनगर

कोरोना : जिल्ह्यात शुक्रवारी 146 रुग्णांना डिस्चार्ज, 102 नवे बाधित

जाहिरात - Todays Offer

जिल्ह्यात शुक्रवारी 146 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 69 हजार 385

इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.26 टक्के इतके झाले आहे. दरम्यान शुक्रवारी रुग्ण संख्येत 102 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 866 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 48, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 34 आणि अँटीजेन चाचणीत 20 रुग्ण बाधित आढळले.

Shrirampur Ads

जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 16, अकोले 1, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 4, पारनेर 6, पाथर्डी 5, राहता 2, राहुरी 3, संगमनेर 2, शेवगाव 1 आणि श्रीगोंदा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 10, अकोले 1, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 8, पारनेर 3,पाथर्डी 1, राहाता 2, राहुरी 1, संगमनेर 1 आणि शेवगाव 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 20 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 1, अकोले 3, कर्जत 4, नेवासा 2, पारनेर 3, राहता 5 आणि संगमनेर 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close