Dedicated Server

 

 

Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात 55 कोरोनाबाधित

Spread the love

श्रीरामपूर तालुक्यात काल एका दिवसात 55 रुग्ण आढळून आले आहे. काल श्रीरामपूर तालुक्यातील

जिल्हा रुग्णालयात 17, खासगी रुग्णालयांमध्ये 29 तर अँटीजन चाचणी तपासणीत 09 असे 55 रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाचे उपचार करुन एकूण 13 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील जनतेने कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 409 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 207 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 202 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close