Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूरला कोरोना ची लागण: एकाच दिवशी आढळले दोन रुग्ण

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

श्रीरामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आता मोठ्या शहरांबरोबरच गावांमध्येही वाढू लागला आहे. मोठ्या शहरांमधून गावी परतलेल्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच श्रीरामपूरमध्ये हि कोरोनाचे हे लोण वाढत असल्यामुळे प्रशासन आणि गावकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shrirampur Ads

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील तीन तर मुंबईहून गोंधवणी येथे आलेले व विलगीकरण कक्षात असलेले चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्यानंतर, काल दि. 24/06/2020 रोजी अशोकनगर, निपाणी वडगांव मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने श्रीरामपूर मध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर तालुक्यामध्ये दोन आणखी पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या वाढली असून श्रीरामपूरमध्ये भीतीचे वातावरण निर्मांण झाले आहे.

जाहिरात - 5

ह्या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि सदर एक रुग्ण हा गोंधवनी परिसरातील असून दुसरा रुग्ण हा महांकाळ वडगाव येथील असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, दरम्यान संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील अनेक लोकांची माहिती घेण्यास सुरुवात सुरु झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी श्रीरामपूर टाइम्स ला दिली.

टॅग्ज
Advertisement

4 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close