Advertise -2

 

 

अहमदनगर
चर्चेत असलेला विषय

गोंधवणीतील बॅरिकेड मध्ये विद्युत प्रवाह ; जिवीतहानी टळली…

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– कोपरगावकडून एक रुग्णवाहिका गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला घेवून गोंधवणीपर्यंत आली. परंतु करोनाबाधित रुग्ण सापडल्याने गोंधवणीचा भाग सील करण्यात आला आहे. रुग्णाला तातडीने घेवून जाणे गरजेचे असल्यामुळे तेथील लोखंडी पाईप काढण्यासाठी गेले असता त्या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे चारपाच लोकांना त्याचा झटका बसला. ही बाब काहींच्या लक्षात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. एवढी मोठी घटना घडल्याची माहिती सांगितली असता अधिकारी व पदाधिकार्‍यांनी एकमेकांवर ढकला ढकली केल्याने संताप व्क्त होत आहे.गोंधवणी शिवारात चार दिवसापूर्वी करोना बाधीत रुग्ण सापडल्याने गोंधवणी परीसर सील केला आहे. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोपरगावकडून रुग्ण घेवून रुग्णवाहिका गोंधवणीपर्यंत पोहोचली. परंंतु परिसर सील असल्याने रस्ता बंद होता; परंतु रुग्णाला घेवून रुग्णवाहिका जाणे आवश्यक होते. तेथील नागरिकांनी पाईप काढून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत असताना त्या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता.या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याची माहिती भैरवनाथनगरचे सरपंच भारत तुपे यांनी प्रांंताधिकार्‍यांंना सांगण्यासाठी फोन केला त्यांचा मोबाईल बंद होता. तहसीलदाशी संपर्क केला असता मी अधिकार्‍यांना सांगतो असे त्यांनी सांगितले. नगरपालिकेत फोन केला तर हे पोलिसांचे काम आहे असे उत्तर मिळाले. त्यानंतर उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना सांगितले असता त्यांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना खडसावून घटनास्थळी पाठविले. या कर्मचार्‍यांनी तातडीने या पाईपमध्ये उतरलेला प्रवाह बंद करून रस्ता मोकळा केला. त्यांतर रुग्णवाहिका श्रीरामपूरकडे रवाना झाली, असे भारत तुपे यांनी सांगितले.

Shrirampur Ads

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close