Advertise -2

 

 

अहमदनगर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपूर – राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्राध्यापक जोशीं यांची निवड

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपूर प्रतिनिधी-प्रविण जमधडे- : तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्रीक्षेत्र रेणुका देवी आश्रमाचे कार्यकारी विश्वस्त प्रा. अड. आदिनाथ जोशी यांची राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या मठ-मंदिर समिती कार्यकारिणीवर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नुकतेच नियुक्ती पत्र राष्ट्रीय महासचिव डॉ पद्मनाभगिरी यांनी पाठवले आहे.

पालघर येथील अमानवीय घटनेनंतर साधूसंत सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला देशात संत तसेच मंदिर ,मठ,देवस्थान यांच्यात संपर्क व समन्वय सूत्र असावे या हेतूने राष्ट्रीय पातळीवर संत सुरक्षा परिषद स्थापन झाली असून देशभर विस्तार होत आहे. वारकरी, पुरोहित, मठमंदिर व महिला आघाडी असे विविध आयाम आहेत.अहमदनगर जिल्हा संपर्कसूत्र व अध्यक्ष पद श्री जोशी यांना देण्यात आले आहे.

Shrirampur Ads

श्री आदिनाथ जोशी हे ऊच्चविद्याविभूषित असून कायदे विषयक पदवीही संपादन केलेली आहे तसेच संगीत क्षेत्रात पदवी व पत्रकारीतेत पदविका मिळविलेली आहे. श्रीक्षेत्र रेणुकादेवी आश्रमाचे माध्यमातून विविध सांस्कृतिक, अध्यात्मिक,सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहे. जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान, मठ मंदिर व संत महंतांचे संपर्कात आहेत. ते एक प्रभावी सुत्रसंचालक व संयोजक आहेत. धर्मप्रचार व प्रसार करण्याचे काम ते करत असतात. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे महत्वाचे योगदान असून हिंद सेवा मंडळात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या सर्व बहुआयामी कार्याची दखल घेत राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेवर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्वामीराज राजेश्वर गिरीजी महाराज यांनी अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांना रेणुका देवी आश्रमाचे संस्थापक देवीभक्तपरायण सदगुरू रेवणनाथ महाराज करवीर संकेश्वर पीठाचे शंकराचार्य विद्यानरसिंह भारती, संगीताचार्य श्रीमती शुभलक्षमी थत्ते मॅडम,ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर संत सुरक्षा समिती प्रदेश प्रवक्ता वेदाचार्य सुयशशास्त्री शिवपुरी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. राष्ट्रीय महासचिव स्वामी डॉक्टर पद्मनाभन गिरीजी यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. या निवडी बद्दल समाजातील विविध स्तरांतून तसेच सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन होत आहे.जिल्ह्यातील तालुका संपर्क सूत्र निवडीचे अधिकार त्यांना देण्यात आले आहे.

जाहिरात - 5
 

  

टॅग्ज
Advertisement

5 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close