Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

श्रीरामपुरात कोरोनाचा हाहाकार…एकाच दिवशी ५ पॉसिटीव्ह

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

शहरात एका व्यक्तीसोबत ५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील मोठ्या पदावर असणाऱ्या
४७ वर्षीय तरुण कोरोना बाधित आढळला होता. त्यांच्या कुटुंबासह १७ जणांचे घश्याच्या स्राव नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर या बाबत आरोग्य विभागाकडून आज सकाळी माहिती मिळाली. कुटुंबातील ४ जण व त्यांचा १ सहकारी असे ५ रिपोर्ट पॉसिटीव्ह व बाकी ६ अहवाल निगेटिव्ह आले असून अद्याप ६ अहवाल येणे बाकी आहेत. पॉझिटिव्ह रिपोर्टच्या संख्येने प्रशासनाला हादरा दिला.

Shrirampur Ads

ShrirampurTimes

जाहिरात - 5

ShrirampurTimes

वाढत्या रुग्णांच्या संख्येने ग्रामीण परिसरासह श्रीरामपूर शहरात प्रचंड प्रमाणात नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले असून गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गाव पूर्णपणे सील करण्यात येऊ शकते . आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करीत असून स्यानिटायझर व मास्क चा नियमितपणे वापर करण्याबाबत नागरिकांनी दखल घेणे गरजेचे आहे. श्रीरामपूर शहरात ही सर्वात मोठी घटना कोरोना च्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी नागरिकांसमोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी आपापल्या घरात राहून सोशल डिस्टन्स पाळत स्वछता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांनी केले आहे.

टॅग्ज
Advertisement

5 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close