Advertise -2

 

 

अहमदनगर
चर्चेत असलेला विषय

वॉर्ड नं. २ मधील त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चौघे निघाले कोरोना बाधित

जाहिरात - Todays Offer

दफनविधी आटोपल्यानंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयातुन मृतदेह कोरोनाबाधित अाहे. पुन्हा नगरला पाठवा असा निरोप आला होता. परंतु तोपर्यंत दफनविधी उरकल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले.

दफनविधी आटोपल्यानंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयातुन मृतदेह कोरोनाबाधित अाहे. पुन्हा नगरला पाठवा असा निरोप आला होता. परंतु तोपर्यंत दफनविधी उरकल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार स्थानिक आरोग्य विभागाच्या लक्षात येताच त्यांनी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीना ताब्यात घेत तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्त्राव घेतले. आज त्यातील चौघांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे शहरात कोरोना फैलाव वाढला आहे.

Shrirampur Ads

मागील आठवड्यात येथील एक अधिकारी कोरोनाबाधित आढळुन आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील चौघांसह एक सहकारी तर लोकप्रतिनीधी व त्याच्या पत्नी तसेच त्यांचा चालक कोरोबाधित झाल्याने शहरात कोरोनाची साखळी वाढली. प्रशासन कोरोनाची साखळी तोडत असताना शनिवारी (ता. 4) पहाटे प्रभाग दोन परिसरातील एकाचा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला.

जाहिरात - 5

कुटुंबीयाच्या मागणीनुसार जिल्हा आरोग्य विभागाने सदर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. कुटुंबियांनी मृतदेह प्रभाग दोन परिसरात आणुन आरोग्य आणि पोलिसांच्या उपस्थित दफनविधी केला. त्यानंतर मृत रुग्ण कोरोनाबाधित असुन मृतदेह तात्काळ नगरला पाठवा असा निरोप नगर येथुन आला. परंतू तो पर्यंत दफनविधी उरकला होता.

हा सर्व प्रकार शहरातील नागरीकांना माहित पडताच अनेकांनी संताप व्यक्त केला. आरोग्य विभागाच्या बेजबादार कार्यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिक प्रशानाने त्यावर सारवासारव केली. यासंर्भात येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. दफनविधी केलेल्या कुटुंबातील चौघांचे तपासणी अहवाल आज कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 24 झाली अाहे. कोरोनामुळे तीघांना जीव गमवावा लागला. सध्या तपासणी अहवाल येण्यास विलंब होत असल्याने क्वाॅरंटाईन केलेल्यांसह त्यांच्या कुटुंबियाची धाकधुक वाढली आहे. 11 कोरोनाबाधित रुग्णांवर संतलुक रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गंभीर स्वरुपातील रुग्णांना नगरला पाठविले जाते. तसेच ग्रामीण रुग्णालयात घशातील स्त्राव घेवुन तपासणीसाठी नगरला पाठविले जातात. अहवाल मिळेपर्यंत आंबेडकर वस्तीगृह, ग्रामीण रुग्णालयात क्वाॅरंटाईन केले जाते. तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 80 हुन अधिक जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत.

टॅग्ज
Advertisement

2 टिप्पण्या

  1. जेव्हा सुशिक्षित अधिकारीआणि जबाबदार लोकप्रतिनिधी अशिक्षित आणि बेजबाबदारपे वागत असतील तर सामान्य माणसांनी काय करावे?

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close