Dedicated Server

 

 

Shrirampur

श्रीरामपूर : जिल्हाधिकार्‍यांचे बंदी आदेश असतानाही आठवडे बाजार भरवून परत उठवला

Spread the love

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आठवडे बाजार भरविण्यास बंदी घातलेली असतानाही

काल श्रीरामपूरचा शुक्रवारचा आठवडे बाजार सकाळी भरण्यास सुरुवात झाली होती. नगरपालिकेच्या काही कर्मचार्‍यांनी या आठवडे बाजारातील व्यावसायिकांकडून दैनंदिन पावतीही फाडली.

नंतर अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांचा आदेश आठवला आणि पुन्हा बाजार बंदसाठी हे अधिकारी व कर्मचारी पुढे सररसावले. नगरपरिषदेकडून आठवडे बाजाराचे नियोजन नसल्यामुळे बाजाराचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केला आहे.

श्रीरामपूर नगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे आठवडे बाजार भरवून परत उठवल्यामुळे शेतकरी, व्यापारी यांना आर्थिक फटका बसला आहे. या सगळ्या प्रकाराचा निषेध करत असल्याचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे.

जर अगोदरच वर्तमानपत्र व इतर माध्यमातून बाजार बंद असल्याचे जाहीर केले असते तर शेतकरी व व्यापारी यांचा आज आणलेला भाजीपाला वाया गेला नसता. वाहतुकीच्या खर्चाचा नाहक भुर्दंड बसला व रोजंदारीही बुडाली नसती. श्रीरामपूर नगरपालिकेच्या या अनागोंदी कारभारावर शेतकरी व व्यापारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जर आठवडे बाजाराबर बंदी होती,तर नगरपालिकेने पावत्या कशाच्या फाडल्या, असा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close