Advertise -2

 

 

ब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

बाबा ऑल दी बेस्ट… – संग्राम कानडे

जाहिरात - Todays Offer

श्रीरामपुर तालुक्याचे आमदार मा.लहूजी कानडे हे कोरोना विरुद्ध हॉस्पिटलमध्ये लढाई लढत असतांना, आमदार मा.लहूजी कानडे यांचे चिरंजीव श्री.संग्राम कानडे यांनी फेसबुक द्वारे वडिलांना उद्देशुन भावनिक पोस्ट केली.
कोरोना सारख्या संकटाचा सामना निर्भिडपणे करून लवकर घरी परत यावे यासाठी श्री.संग्रामदादा कानडे खाली दिलेल्या फेसबुक पोस्टद्वारे आपले वडील आमदार मा.लहूजी कानडे यांना सांगत आहे.

LA- belle spa salon & academy

प्रिय बाबांस….
प्रत्येक क्षणाला सावलीसारखे पाठीमागे उभे असणारे माझे मित्र माझे बाबा.. आज आपण कोरोनाशी संघर्ष करताय, पण मला खात्री नाही तर संपूर्ण विश्वास आहे कि आपण यावर नक्की मात करणार.
बाबा आम्ही लहानपणापासून पहात आलोय आपण केलेला संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीतून मात करत यशाची शिखरे कशी पादाक्रांत करायचे हे आम्ही तुमच्याकडे पाहूनच शिकलोय. आयुष्यभर लोकांच्या सेवेसाठी तसेच कुटुंबाच्या उत्कर्षाकरीता आपण केलेल्या संघर्षाचे आम्ही साक्षीदार आहोत. बाबा आपण माझ्यासाठीच काय संपूर्ण कुटुंबासाठीच उर्जेचा स्रोत आहात, आपणात असणारा प्रचंड आत्मविश्वास, जिद्द व संघर्ष करण्याची तयारी यामूळेच आम्हास लढण्याचे बळ मिळते. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पहाण्याचा आपला दृष्टीकोन व ती प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याची तुमची पध्दत यामुळे खुप साऱ्या गोष्टी सहज सोप्या व नकळतपणे सुकर होवून जातात.
बाबा आताशी तर आपण राजकारणातील नवी इनिंग सुरु केली आहे. आम्हा सर्वांना खात्री आहे कि आपण याहि क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार, खुप दिवसांनी दिन-दुबळ्यांच्या व्यथा मांडणारा एक लढावू योध्दा लोकप्रतिनीधी झाला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही आम्हाशी नेहमी बोलता त्याप्रमाणे आपणास अजून खुप सारे आभाळभर काम करावयाचे आहे, बाबा हि तर फक्त सुरवात आहे अजून आपणास जनसामान्याचे जगणे सुकर करावयाचे आहे. श्रीरामपूरचे आमदार म्हणून श्रीरामपूर पुन्हा एकदा वैभवशाली बनवायचा आहे, आताशी तर कुठे मागील सात आठ महिन्यात आपण केलेल्या कामाचे व दिवस रात्र केलेल्या कष्टाचे प्रतिबिंब दिसायला सुरुवात झाली अन् हे कोरोनाचे महासंकट आले, मात्र अजून आपल्याला श्रीरामपूरच्या राजकिय इतिहासात आपला ठसा उमटावयाचा आहे. सर्व मतदारसंघातील नागरीकांनी आपल्या माध्यमातून पाहिलेले विकासाचे स्वप्न आपणास साकार करावयाचे आहे. मला नक्की विश्वास आहे कि आपण श्रीरामपूर मतदारसंघ उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, शेतकऱ्यांचे व मागासवर्गीयांचे प्रश्न यासर्व क्षेत्रात आपल्या प्रशासकिय अनुभवाच्या व प्रयोगशील प्रवृत्तीच्या जोरावर पुन्हा नव्या उंचीवर नेणार. सर्वसामान्यांचे आशास्थान असणाऱ्या आपणास हा कोरोना विषाणू रोखू शकणार नाही याची मला खात्री आहे.
बाबा मी आजपर्यंत तुम्हाला कधीही हॉस्पिटलमधे अॅडमिट असलेले पाहीलेले नाही यामुळे मन थोडे हळवे झाले आहे. बाबा तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व आहात, कानडे कुटुंबा करीता व तुमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांकरीता प्रेरणास्रोत आहात. तुमच्याकडे पाहूनच आम्हाला दररोजच्या जगण्याची प्रेरणा मिळते यामुळे तुम्हाला आता पुन्हा नव्या जोमाने या कोरोनाशी संघर्ष करून त्यावर मात मिळवायची आहे. नेहमीसारखेच “कधीही न हारणारे” हि प्रतिमा कायम ठेवायची आहे. तुम्ही या कठिण प्रसंगामधून लवकरच बरे होवून पुन्हा जोमाने कामाला लागणार याचा मला पूर्ण विश्वास आहे.
बाबा स्वतःची काळजी घ्या व लवकर बरे व्हा….
आम्ही सारे आपली वाट पहात आहोत..
आपलाच
संग्राम दादा…

Shrirampur Ads

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

3 टिप्पण्या

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close