Dedicated Server

 

 

Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात 105 कोरोनाबाधित रुग्ण

Spread the love

श्रीरामपूर तालुक्यात काल रविवारी उच्चांकी 105 रुग्ण सापडले आहे. तर 690 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये

उपचार घेत आहेत. शहरात 59, तालुक्यात 43 रुग्ण काल आढळून आले असून बाहेरील तालुक्यातीन असे रुग्ण आहेत. काल 75 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत. कालही कोरोनारुग्ण वाढीच्या बाबतीत अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर चौथ्या क्रमांकावर जावून पोहोचला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात काल 105 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहे. जिल्हा रुग्णालयात 28 खासगी रुग्णालयात 53 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 24 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 75 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 690 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 1542 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 750 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 690 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात – 59, ग्रामीण भाग- 43, बाहेरील तालुका -3 असे एकूण – 105 रुग्ण आहेत. यात श्रीरामपूर शहरातील खासगीत 37 तसेच वॉर्ड नं. 1- 08, वॉर्ड नं. 2-02, वॉर्ड नं. 3-05, वॉर्ड नं. 6-02, वॉर्ड नं. 7-05 असे 59 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागातील बेलापूर -07, उंबरगाव-01, फत्याबाद-02, निपाणीवडगाव-02, खंडाळा-01, माळवाडगाव-01, पढेगाव-03, उककलगाव-02,वडाळा महादेव-01, अशोकनगर-04, गोंडेगाव-02, मातुलठाण-01, गोंधवणी-03, कारेगाव-02, टाकळीभान-04, गुजरवाडी-04, पाचेगाव-01, भाकेर-01, खोकर-01 असे एकूण 43 रुग्ण आढळून आले आहेत. इतर तालुक्यातील म्हणजे राहाता तालुक्यातील नांदूर नगर तालुका गुंदेगाव, वैजापूर तालुक्यातील बाजाठाण येथील प्रत्येकी एक-एक असे तीन रुग्ण आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी जास्त होत असली तरी चिंता कायमच आहे. तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडायची असेल तर जे लोक विनामास्क फिरत असतील त्यांचेवर निर्बंध आणले पाहिजे. शासनाने घालून दिलेले नियम सर्वांनी पाळावेत. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांना सहकार्य करावे. जे कोणी नियम पाळणार नसतील त्यांचेविरुध्द कडक कारवाई करण्याचा बडगा उचलणार असल्याचा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला. खासगी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करताना शासनाने घालून दिलेले दराप्रमाणेच आकारणी करावी. कोणते रुग्णालयात जास्त दर आकारत असेल तर त्यांची तक्रार करावी, त्यांचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहर व तालुक्यात मोठ्याप्रमाणावर गर्दी करु नये, असे आवाहन तहसीलदार श्री. पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close