Advertise -2

 

 

अहमदनगरब्रेकिंगश्रीरामपूर
चर्चेत असलेला विषय

BREAKING : श्रीरामपूर कारागृहातील चार कैद्यांना कोरोनाची लागण..

जाहिरात - Todays Offer

LA- belle spa salon & academy

श्रीरामपूर टाइम्स : श्रीरामपूर इथले पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच आरोपी यांच्यामध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. राज्यात बहुतेक जेलमध्ये कैदी कोरोना बाधित आढळले असून फक्त श्रीरामपूर कारागृहात एक ही रुग्ण नव्हता. मात्र आता या कारागृहात ही कोरोना पोहोचला आहे.

श्रीरामपूर कारागृहातील असणाऱ्या कारागृहात चार कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. १० कैद्यांच्या कोरोना टेस्ट केल्या असता त्यामध्ये ४आरोपींची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलेली आहे. चारही कैद्यांना राहुरी येथील शेतकरी भवन कोविड सेंटर ला हलविण्यात आले आहे. काही स्वॅब रिपोर्ट हॉस्पिटलला प्रलंबित आहे.

Shrirampur Ads

पोलीस कर्मचारी व अधिकारींमध्ये भीतीचे वातावरण

आज सकाळी पुन्हा उर्वरित ४० कैद्यांची रॅपिड टेस्ट सुरू झाली. त्यामुळे याठिकाणी नेमणुकीस असणारे अधिकारी व कर्मचारी तसेच आरोपी यांच्या मध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. राज्यात बहुतेक जेलमध्ये कैदी कोरोना बाधित आढळले असून फक्त श्रीरामपूर कारागृहात एक ही रुग्ण नव्हता. मात्र आता या कारागृहात ही कोरोना पोहोचला आहे.

जाहिरात - 5

टॅग्ज
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

संबंधित लेख

Back to top button
Close
Close