Dedicated Server

 

 

Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेने तातडीने कोविड सेंटर सुरू करावे

Spread the love

श्रीरामपूरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून श्रीरामपूर येथील सर्व कोविड सेंटर दिवसेंदिवस भरत चालले आहे.

रुग्णांना बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ही गंभीर बाब असून श्रीरामपूर नगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. एकीकड़े संगमनेर, देवळाली प्रवरासारख्या नगरपालिकांनी कोविड सेंटर सुरू केले असताना श्रीरामपूर नगरपालिका का करु शकत नाही असा सवाल काँग्रेसच्या नगरसेवकांनी करून सर्वसामान्य जनतेसाठी श्रीरामपूर नगरपालिकेने कोरोना आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात घेता प्रियदर्शनी इंदिरा मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी कॅांग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्याधिकार्‍यांनी 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना घेरावा घालण्याचा इशारा काँग्रेस नगरसेवकांनी दिला आहे. याप्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक मुजफ्फर शेख व रितेश रोटे उपस्थित होते. पक्षप्रतोद संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, भारतीताई परदेसी, आशाताई रासकर, मनोज लबडे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close