Dedicated Server

 

 

Shrirampur

शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व कोविड सेंटर सुरु करणार – आदिक

Spread the love

श्रीरामपूर पालिकेच्यावतीने लवकरच शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरनाबरोबरच कोविड सेंटर सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिली.

शहरातील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नगराध्यक्षा आदिक यांनी पालिकेत बैठक आयोजित केली होती. सध्या ग्रामीण रुग्णालयात मोफत लसीकरण सुरू आहे.

हे रुग्णालय शहरापासून लांब असल्याने नागरिकांना जाण्या येण्यासाठी गैरसोय होत होती. पालिकेच्यावतीने सोशल क्लब व प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय या ठिकाणी लसीकरणाची सुविधा सुरू करता येऊ शकते,

अशी सूचना मांडली. दोन्ही पैकी एक जागा निश्चित करण्यात येवून त्याठिकाणी लसीकरणाची सुविधा सुरू करू, असे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले. यावेळी अधिकार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून शहरात लसीकरणासाठी दोन डॉक्टर व चार आरोग्य सेविका उपलब्ध करून द्याव्यात,

अशी मागणी केली. ग्रामीण रुग्णालयातील अधिकार्‍यांनी यास सकारात्मक ता दर्शवून लवकरच कर्मचारी व अधिकारी उपलब्ध करून दिले जातील, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close