Dedicated Server

 

 

Shrirampur

तू माझ्या बापामुळं निवडून आला असं म्हणत नगरसेविकेच्या पतीस धक्काबुक्की

Spread the love

श्रीरामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडियाची धुरा सांभाळत पक्ष धैय्य धोरणात्मक बातम्या, सकारात्मक कार्य पक्ष कार्यकर्त्यापर्यंत पोहचवण्याचे प्रामाणिक पक्ष कार्य करत असतात.


स्थानिक लोकनेत्यांना कोविड सेंटर सुरु करावे असे आवाहन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चना पानसरे यांनी एका वृत्तपत्राद्वारे केले होते. सदर बातमी नगरसेविकेच्या पतीने सोशल मीडिया माध्यमाद्वारे


पाठवल्या कारणाने राग आलेल्या युवा नेत्याने नगरपालिकेत धाव घेत पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ” तूला माझ्या बापाने निवडून आणलय आणि तू आमच्या विरोधातल्या बातम्या लोकांना पाठवतोय, तुला तिकीट नाकारलं होत माझ्या बापामुळं तू निवडून आला” असे वक्तव्य करत दाढी वढून तू उठ तुला बघतो असे म्हणत नगरसेविका पतीस धक्काबुक्की केली . यावेळी पालिकेत चांगलाच गदारोळ बघायला मिळाला, दरम्यान इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close