Dedicated Server

 

 

Shrirampur

आताची मोठी बातमी ! …..अखेर मुथ्था पिता-पुत्र जेरबंद

Spread the love

माळवाडगांव/प्रतिनिधी :- मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देत माळवाडगाव येथून पसार झालेल्या मूथ्था बाप-बेट्याला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आज दि.९ रोजी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.


श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव सह परिसरातील आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून माळवाडगांव येथील मुथ्था कुटुंबीय हे सहा फेब्रुवारी रोजी रात्री पसार झाल्याची घटना घडली होती याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या

शेतकऱ्यांच्या वतीने नऊ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटूनही मुथ्था कुटुंबीयांचा कोणताही ठावठिकाणा पोलिसाना न लागल्याने पोलिसांच्या तपासावर शेतकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपास अधिकारी मसूद खान यांची बदली करून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियुक्ती केली.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या आठ दिवसातच मुथ्था कुटुंबातील गणेश उर्फ मुन्ना मूथ्था व आशा मूथ्था यांना (गणपूर ता.चोपडा जि.जळगाव) येथून ताब्यात घेतले तर त्यानंतर दोन दिवसातच चांदणी मूथ्था हिला (बळसाने ता.साक्री जि. धुळे) येथून ताब्यात घेतले त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले रमेश मूथ्था आणि चंदन मूथ्था यांना आज दि.९ एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली आहे.या कामात पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे,हेड कॉ.नवनाथ बर्डे,राजेंद्र लवांडे,दादासाहेब लोढे,गोपनियचे अनिल शेंगाळे,

काकासाहेब मोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली तर पोलीस पाटील संजय आदिक,शेतकरी पंचकमेटीचे गिरीधर आसने,नानासाहेब आसने,शरद आसने,सुदामराव आसने,गणपतराव आसने,दत्तात्रय दळे यांनी तापसकामी पोलिसांना सहकार्य केले .

या प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश मूथ्था आणि चंदन मूथ्था यांना अटक झाल्याची माहिती माळवाडगांव परिसरात समजताच शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

पो.नि.मधुकर साळवे दिलेला शब्द केला पूर्ण
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी माळवाडगाव येथे भेट दिली असता त्यांनी मूथ्था कुटुंबियांना आठ दिवसात जेरबंद करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते आणि त्यांनी ते पूर्ण देखील केले.

माळवाडगाव येथील शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झालेल्या मुथ्था पिता पुत्राला अटक झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मानले माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील,पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे आभार….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close